हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

धारदार हत्याराने इसमाची निर्घृण हत्या ◼️गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथील घटना : आरोपी अज्ञात

spot_img

🔴 LIVE TV 🔴

धारदार हत्याराने इसमाची निर्घृण हत्या

◼️गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथील घटना : आरोपी अज्ञात

गोंदिया क्राइम बातमी – : घरी झोपलेल्या व्यक्तीच्या घरात प्रवेश करून अज्ञात आरोपींनी धारदार हत्याराने त्याच्या गळा व छातीवर वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथे आज, गुरुवार (दि.२) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. ढिवरू इसन इळपाचे (वय ५५) असे मृताचे नाव आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावरच लग्नाचा आशिर्वाद समारंभ असताना सदर हत्याकांडाची कुणालाही भनक लागली नसल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृताचा मुलगा हा नागपूर बुट्टीबोरी येथे राहत असून त्याची पत्नी सडक अर्जुनी तालुक्यातील मुंढरीटोला येथे नातेवाईकांकडे लग्नकार्यात गेली होती. तर घटनेच्यावेळी मृत ढिवरु व त्याची आई सरस्वताबाई इळपाचे (वय ७५) हे दोघेही दार उघडे ठेवून घरी झोपले होते. त्यातच घराशेजारील बळीराम मोहनकर यांच्या नातवाच्या लग्नाचे आशिर्वाद समारंभाचे कार्यक्रम असल्याने रात्री उशिरापर्यंत वर्‍हाड्यांची चहल-पहल होती. अशातच काही अज्ञात आरोपींनी रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करून ढिवरूच्या गळा व छातीवर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून केला. मृताच्या आईच्या सांगण्यानुसार पहाटे ३ वाजताच्या सुमारास ती झोपेतून उठल्यानंतर तिला दारात ढिवरुचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. तिने या प्रकाराविषयी शेजारील आपल्या पुतण्याला सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखा पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. घटनेची नोंद गोरेगाव पोलिसांनी केली असून पुढील तपास ठाणेदार अजय भुसारी यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

◼️ आशिर्वाद समारंभ व दुसरीकडे थरार…

घटनेच्या रात्री मृताच्या घराशेजारीच लग्नाचे आशिर्वाद समारंभ असल्याने रात्री उशिरापर्यंत वऱ्हाड्यांची रेलचेल होती. तर सर्वत्र आनंद पसरलेला होता. अशातच दुसरीकडे हा थरार घडून आला. मात्र, कुणाला याची साधी भणकही लागली नाही. तर सकाळी या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली.

◼️पोलिसांसमोर अनेक प्रश्न

मृत ढिवरु हा गावात किरकोळ अवैध दारु विक्री करीत असल्याची माहिती आहे असे असले तरी गावात त्याचे कुणाशीही वैर नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तर कुटुंबातही सर्वकाही व्यवस्थित होते. तेव्हा एवढ्या निर्दयतेने त्याचा खून कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत असून नेमका कोणत्या कारणावरून त्याची हत्या करण्यात आली? एवढ्या वऱ्हाड्यांच्या चहल-पहलीत आरोपींनी हा हत्याकांड कसा घडवून आणला असावा ? असे अनेक प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाले आहेत.

spot_img
spot_img