हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

आता विहीर पण आम्हीच खोदू आणि पाणी पण आम्हीच पिणार: बागडे

spot_img

🔴 LIVE TV 🔴

आता विहीर पण आम्हीच खोदू आणि पाणी पण आम्हीच पिणार: बागडे
….

नागपूर ग्रामीण:दि.२९ फेब्रुवारी – भरपूर झाले नेत्यांना मोठं करता करता, पायाला फोडे आणि हाताला छाले आले, विहीर आम्ही खोदली पाणी लागताच पहिला स्वाद नेत्यांनी घेतला. जेव्हा आम्हची वेळ आली तेव्हा विहीरीला कुंपण घालून आमच्यावर मज्जाव केला.
आता तसे होता कामा नये, विहीर आम्हीच खोदू आणि पाणी पण आम्हीच पिणार असे प्रतिपादन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले.

त्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य आणि रिपब्लिकन जेष्ठ नेते दिनेशजी बनसोड यांच्या काटोल मतदार संघात असलेल्या शेतात शासनाच्या योजना अंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीच्या भुमी पुजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर पांडुरंग हिवरकर, वंचित बहूजन आघाडी नागपूर शहर अध्यक्ष रवी शेंडे आंविमो चे राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे, सरदार आदम भाई अहूलवीयागर्जना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश भाई ठाकूर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला रामटेके मतदार संघातील आंबेडकरी नेते व कार्यकते मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे विजय वानखेडे यांनी कळविले.

spot_img
spot_img