हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

स्मरण भीमराया आभासी स्पर्धेचे पारितोषिक वाटप ◼️सडक अर्जुनीत थाटात रंगला सोहळा

spot_img

🔴 LIVE TV 🔴

स्मरण भीमराया आभासी स्पर्धेचे पारितोषिक वाटप

◼️सडक अर्जुनीत थाटात रंगला सोहळा

गोंदिया : माजी सामाजिक न्याय मंत्री माननीय राजकुमार बडोले यांचे अध्यक्षतेखाली स्मरण भीमराया ह्या ऑनलाइन क्वीज कॉम्पिटिशनचे पारितोषिक वितरण कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या सडक अर्जुनी येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते.

विश्वरत्न बोधिसत्व भारतीय घटनेची शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘ स्मरण भीमरायाʼ राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा -2024 चे आयोजन करण्यात आले होते. या ऑनलाइन परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 2 हजार 176 स्पर्धकांनी नोंदणी केली होती. ज्यापैकी 21 मे रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रश्नमंजुषा परीक्षेत 492 परीक्षार्थी सहभागी झाले होते. एकूण 600 मार्क असलेल्या अर्ध्या तासाच्या हा परीक्षेत 600 पैकी 600 गुण प्राप्त करणारे सात परीक्षार्थी होते. पैकी तीन परीक्षार्थींनी वेळेत आपला फॉर्म सबमिट केल्याने क्वालिफाईड झाले.

स्पर्धकांनी त्यांचा फॉर्म किती वेळात सबमिट केला या आधारे त्यांची रँक ठरवण्यात आली होती. ज्यामध्ये वणी येथील संगीता चंदनखेडे यांना 30 हजार रुपये रोख थायलंडून आणलेली बुद्धमूर्ती प्रशस्तीपत्र व शील्ड देऊन प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. तर नुशान घनश्याम हुमणे नागपूर हे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. त्यांना 20 हजार रुपये रोख, थायलंड इथून आणलेली बुद्धमूर्ती व शील्ड तसेच तृतीय क्रमांकासाठी स्वाती विकास उंदीरवाडे रा. निलज, जि. गोंदिया यांना 10 हजार रुपये रोख थायलंड वरून आणलेली बुद्धमूर्ती प्रशस्तीपत्र व शील्ड पारितोषिक म्हणून देण्यात आले. याचबरोबर सर्वोत्तम दहा स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व थायलंड वरून आणलेल्या बुद्ध मुर्त्या प्रदान करण्यात आल्या. स्पर्धेचे आयोजन राजकुमार बडोले फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात राकेश भास्कर प्रशांत शहारे यांनी केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, माजी सभापती गिरधारी हत्तीमारे, माजी उपसभापती राजेश कठाणे, प्रल्हाद वरठे, तुलाराम येरणे, तुकाराम राणे, रंजना भोई आदी उपस्थित होते. कार्यक्रमात स्पर्धक स्पर्धकांचे पालक व बहुसंख्याक उपस्थित होते.

spot_img
spot_img