हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

जवाहरलाल नेहरू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस  साजरा..!

spot_img

🔴 LIVE TV 🔴

जवाहरलाल नेहरू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस  साजरा..!

नागपुर – शारीरिक क्रीडा व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिवस व राष्ट्रीय हॉकी क्रीडापटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन क्रीड़ा दिवस म्हणून साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय टेकाडे होते. प्रमुख अतिथी डॉ. जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरीग विभाग प्रमुख डॉ. इंदरजीत सिंह रंधावा यांना आमंत्रित करण्यात आले होते.  महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आय. एस. एफ. अधिकारी जितेंद्र ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. टेकाडे यांनी दोन्ही अतिथींचे पुष्परोप देवून स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सारंग खडसे यांनी केले. डॉ. खडसे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. खेळ हा व्यायामाचाच भाग असल्याने दररोज थोडा वेळ विद्यार्थ्यांनी खेळायलाच पाहिजे. शारीरिक व मानसिक स्वास्थ निरोगी ठेवायचे असेल तर खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक होणे गरजेचे आहे असे मत खडसे यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाल की मेजर ध्यानचंद हे सामान्य कुटुंबातीलच होते मात्र खेळाविषयी त्यांना असलेले असीम प्रेम आणि जिद्दी मुळे आज ते हॉकीचे जादूगर म्हणून ओळखले जातात. अशी जिद्द प्रत्येक तरुणात असायला पाहिजे अशी प्रेरणा खडसे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना  दिली.

अतिथी डॉ. इंदरजीत सिंह रंधावा हे ह्यांडबॉल इंडिया इंटरनेशनल खेळाडू, छत्रपती शिवाजी पुरस्कार प्राप्त, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, ध्यानचंद, मिल्खा सिंग, नीरज चोपडा व्हायचे असेल तर जीवनात नियोजन असणे गरजेचे आहे. सोबतच आपल्या खेळाविषयी स्नेह, प्रामाणिकता, जिद्द आणि एकाग्रता असणे खूपच गरजेचे आहे. शेवटी ते म्हणाले ‘ क्रीडात तुमचे योगदान ही देश सेवाच आहे ’.

महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी व आय. एस. एफ. अधिकारी यांनी क्रॉस कंट्री मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले, इंडिया कोच व ग्रीन सिटी अकॅडमी डायरेक्टर जितेंद्र ठाकरे विद्यार्थ्यांशी बोलतांना म्हणाले, ‘ मला गार्डनचा माळी बनायचे आहे , म्हणजेच मला तुमचे मार्गदर्शन करायचे आहे.’ सोशियल मिडीयावर व्यस्त राहण्याऐवजी तुमची शक्ती क्रीडा मध्ये खर्च करा. सामाजिक माध्यमांवर हिरो ऐवजी सैनिक, क्रीडापटू होण्याचे स्वप्न बघा, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.

अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टेकाडे म्हणालेत, सध्याचे सामाजिक माध्यम म्हणजे तरुण पिढीला भुरळ घालणारे, निष्क्रिय करणारे प्रभावी यंत्र आहे. याला बळी न पडता तरुणांनी त्यांच्या करियरचा विचार करायला हवा. क्रीडाक्षेत्र हे देखील करीयर साठी उत्तम क्षेत्र आहे. आणि महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा वेगवेगळ्या खेळांशी परिचय होतो. म्हणून पाठ्यपुस्तकांसोबतच खेळ देखील जीवनात विशेष महत्व द्या असे मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. मानमोडे यांनी केले. आभार डॉ. खडसे यांनी व्यक्त केले. यावेळेस सभागृहात महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापक , कर्मचारी तसेच मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित होते.

spot_img
spot_img