हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

सासरच्या मंडळींनीच केले बेरोजगार ◼️विधवा सुनेचे पत्रकार परिषदेतून आरोप

spot_img

🔴 LIVE TV 🔴

सासरच्या मंडळींनीच केले बेरोजगार

◼️विधवा सुनेचे पत्रकार परिषदेतून आरोप

गोंदिया, बातमी : पतीच्या निधनानंतर कापड दुकान चालवून उदरनिर्वाह करीत असताना दुकानावर सासरच्या मंडळींनी कब्जा करून दुकानातील विक्रीचे कापडे घेऊन जात आपल्याला बेरोजगार केला असल्याचा आरोप किरण योगेश भेलावे रा. गोरेगाव या विधवा सुनेने आपल्या सासरच्या मंडळींवर केला आहे. तर या विषयी पोलीसात तक्रार दाखल करूनही काहीच उपयोग झाला नसल्याने आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी गुरुवारी ( ता ०२) पत्रकार परिषदेतून केली आहे.

यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या रितु वाघ उपस्थित होत्या. किरण भेलावे यांनी सांगितले की, त्यांचे माहेर गोरेगाव तालुक्यातील मेंगाटोला येथील असून त्यांचा म्हसगाव येथील युवक योगेश भेलावे यांच्याशी दि. ४ सप्टेंबर रोजी विवाह झाला होता. दरम्यान, त्या उच्च शिक्षित असताना नोकरी नसल्याने त्यांचे पती योगेश भेलावे यांनी गोरेगाव येथील दुलीचंद श्रीपात्रे यांच्याकडून भाड्यावर खोली घेत किरण यांच्या नावाने कापडा विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. तर भाडेपत्राचा करारनामा लिहून संपुर्ण दुकानाचे मालकी हक्क किरण भेलावे यांना दिले होते. मात्र, योगेश भेलावे यांचे ५ मार्च रोजी निधन झाले. पतीचे निधन होताच कपडा दुकानावर सासरच्या मंडळींनी हक्क बजावायला सुरुवात केली. तर ३० एप्रिल रोजी सासू अंजना भेलावे, भासरा प्रेम भेलावे, जाऊ दामीणी भेलावे सर्व राहणार म्हसगाव, ननंद टेकेश्वरी पंकज साठवणे व तिचा पती पंकज साठवणे, दोघेही राहणार चारगाव यांनी संगणमत करून त्यांच्या दुकानाचे कुलुप तोडुन विक्री करीता ठेवलेले कापड म्हसगाव येथे घेऊन गेले.

किरण यांच्यामते या घटनेच्या एक दिवसाआधी२९ एप्रिल रोजी त्यांची सासू व जाऊ यांनी दुकानावर येऊन त्यांना शिविगाळ करून मारण्याची धमकी दिली होती. ज्याची रितसर तक्रार त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात केली. मात्र, पोलीसांनी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्याऐवजी अदखलपात्र गुन्हाची नोंद करून परत पाठवले. पतीच्या निधनानंतर उदरनिर्वाह करण्याचा साधन असलेले दुकानच आता बंद झाले आहे. त्यामुळे आपण बेरोजगार झालो असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देत आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी आर्त मागणी किरण भेलावे यांनी केली आहे. तर आपल्याला न्याय न मिळाल्यास आपण न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

spot_img
spot_img