हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

एक कोटी ८१ लाखाची रक्कम जप्त ◼️नाकेबंदी दरम्यान भरारी पथकाची कारवाई

spot_img

🔴 LIVE TV 🔴

एक कोटी ८१ लाखाची रक्कम जप्त

◼️नाकेबंदी दरम्यान भरारी पथकाची कारवाई

गोंदिया : निवडणुकीदरम्यान होणाऱ्या आर्थिक व्यवहाराला आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या चमुने आज, (ता. २७) दोन ठिकाणी केलेल्या नाकाबंदी कारवाईत १ कोटी ८१ लाख रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील सोनी व मुंडीपार तपासणी नाक्यावर करण्यात आली.
जिल्हाधिकारी प्रदीप नायर यांच्या मार्गदर्शनात निवडणुकीदरम्यान होणाऱ्या आर्थिक व्यवहारावर आळा घालता यावा यासाठी भरारी पथक नेमण्यात आले असून जिल्ह्याच्या सीमारेषेवर व प्रत्येक तालुकास्तरावर तपासणी नाका उभारण्यात आले आहे. दरम्यान, आज, ( ता. २७)निवडणूक निर्णय अधीकारी पूजा गायकवाड, तहसीलदार किसन भदाणे व इंद्रायणी गोमासे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव तालुक्यातील सोनी नाका जवळ एफएसटी व एसएसटी पथक प्रमुख बाबा शिंदे,सरिता लिलहारे, विलास सूर्यवंशी, रंजना चानप , रामानंदा दास, श्यामकला भोयर, संदीप पटले यांनी संयुक्त कारवाई करत १ कोटी ७६ लाख रुपये जप्त केले. त्याचबरोबर दुसरी कारवाई मुंडीपार नाक्यावर करण्यात आली असून नाकाबंदीदरम्यान पुन्हा ५ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. ही कारवाई एफएसटी-३ व एसएसटी-२ पथक प्रमुख बाबा शिंदे,संदीप बागडे, विलास सूर्यवंशी, राकेश नागपुरे , रामानंदा दास, श्यामकला भोयर , संदीप पटले यांनी केली. दरम्यान गोरेगावचे ठाणेदार अजय भुसारी यांनी कायदेशीर कार्यवाही केली.
००००००

spot_img
spot_img