हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

गोंदिया हादरलाʼ १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून ◼️ देवरी तालुक्यातील गोटाणपार येथील दुर्दैवी घटना

spot_img

🔴 LIVE TV 🔴

गोंदिया हादरलाʼ १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून

◼️ देवरी तालुक्यातील गोटाणपार येथील दुर्दैवी घटना

गोंदिया : जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील गोटानपार येथे (ता.१९) लग्नकार्यात आलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अमाणूस अत्याचार करत तिचा खून केल्याची दुर्दैवी घटना आज (ता.२० ) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे देवरी तालुक्यासह संपूर्ण गोंदिया जिल्हा हादरला असून आरोपीला अटक करून फाशीची शिक्षा द्यावी. अशी मागणी होत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजा गोटानपार येथे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भसबोळन येथील नरेश तितराम यांचा मुलगा राकेश उर्फ रॉकी व देवरी तालुक्यातील गोटानपार येथील कुरूसिंग पडोटी यांची मुलगी हेमलता उर्फ लता यांचे १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता लग्न समारंभ करण्यात आले होते. याच लग्नात अवघ्या सहाव्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन बारा वर्षीय मुलगी ही आपल्या पालकांसह आली होती.

दरम्यान, काही नराधमांनी अंधाराचा फायदा घेत त्या चिमूकलीचे अपहरण करून गावाशेजारील जंगलात घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला व डोक्यावर जबर मारहाण करून तिचा खून केला. दरम्यान, आज सकाळी मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या नागरिकांना तिचा मृतदेह आढळून आला. घडलेल्या घटना क्रमावरून ही घटना सामूहिकरीत्या करण्यात आल्याचे प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास येत आहे. घटनेची माहिती चिचगड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. सदर घटना अतिशय अमानविय व दुर्दैवी असून आरोपींना ताबडतोब अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.

◼️मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर…

एकीकडे लोकशाही मजबूत करण्याकरिता मतदानाचे कर्तव्य पार पाडत असतानाच दुसरीकडे अवघ्या १२ वर्षाच्या चिमुकल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून संपवण्यात आले. या संतापजनक घटनेमुळे देवरी तालुक्यासह संपुर्ण गोंदिया जिल्हा हादरला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तर पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा आणि संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चिचगड पोलिसांना ही घटना कळताच त्यांच्याही पायाखालची वाळू सरकली, सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार बातमी लिहेपर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आले नव्हते.

कृपया संग्रहित छायाचित्र घ्यावे….

spot_img
spot_img