हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

◼️परमात्मा एक सेवकांचा गोरेगाव पोलीस ठाण्यासमोर जमावडा ◼️दोन युवकांवर गुन्हा दाखल

spot_img

🔴 LIVE TV 🔴

जुमदेवजी बाबा यांच्यावर सोशल मिडियातुन पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट

◼️परमात्मा एक सेवकांचा गोरेगाव पोलीस ठाण्यासमोर जमावडा

◼️दोन युवकांवर गुन्हा दाखल

गोंदिया,  : बागेश्वर महाराज यांनी जुमदेव बाबा यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर बागेश्वर महाराज यांच्यावर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. हे प्रकरण तापले असताना आता गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथील दोन युवकांनी जुमदेव बाबा यांचेवर सोशल मिडियातुन आपत्तीजनक पोस्ट केल्याचे पुढे आले आहे. यावर आपत्तीजनक पोस्ट करणार्‍यांवर गुन्हा नोंद करण्याच्या मागणीला घेऊन परमात्मा एक सेवक मंडळाच्या शेकडो अनुयायींनी आज,(ता.१) गोरेगाव पोलीस ठाण्यासमोर एकत्र येत आक्रोश व्यक्त केला. दरम्यान, गोरेगाव पोलिसांनी दोन्ही युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दोन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे बागेश्वर महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, या कार्यक्रमात बागेश्वर महाराज यांनी परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे परमात्मा एक मंडळाच्या स्वयंसेवकांच्या भावना दुखावल्याने काल (ता. ३१)
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे जुमदेव बाबाच्या समर्थकांनी भव्य मोर्चा काढला होता. त्यानंतर बाबा बागेश्वर यांच्यावर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण तापले असताना आता त्यांच्या समर्थकांमधून सोशल मीडियावर कमेंट्स येऊ लागल्या आहेत. दरम्यान, रविवारी (ता ३१) गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथील दोन युवकांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सेवा समिती व्हाट्सअप ग्रुपवर बाबा जुमदेव यांच्या विरोधात पोस्ट केल्याचे दिसून आले.

त्यामुळे एक नवीन वाद पेटले असून परमात्मा एक सेवकांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला. तर याचे पडसाद आज सोमवारी परमात्मा एक सेवक मंडळाच्या शेकडो अनुयायींनी गोरेगाव पोलीस ठाण्यासमोर एकत्रित येत त्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीला घेऊन निदर्शने केली. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गोरेगाव पोलिसांनी खेमेंद्र राऊत (वय २४ रा. कटंगी बुज.) यांच्या तोंडी तक्रारीवरून आक्षेपार्ह पोस्ट करणारे नितेश डोंबळे व गौरव हरिणखेडे या दोन्ही युवकांवर कलम ५०५ (२) व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुजीत घोलप करीत आहेत.

 

सोशल मीडियावर कुणीही विवादित पोस्ट करू नये.

सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यापुढे समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारे सोशल मीडियावर कुणी पोस्ट करू नये.

अजय भुसारी, पोलीस निरीक्षक, गोरेगाव

जुमदेवजी बाबांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे.
बागेश्वर बाबा यांनी मोहाडी येथील प्रवचनात महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची अवहेलना केली. त्यामुळेच आता आमच्या मानव धर्मावर बोट उचलले जात आहेत. कटंगी येथील दोन युवकांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून जुमदेवजी बाबांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. दोन्ही युवकांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. मात्र,असा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. तर यापुढे जो कुणी मानव धर्मावर बोट उचलणार त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी परमात्मा एक सेवक मंडळाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल.

दिलीप सोनवाने, अध्यक्ष, परमात्मा एक सेवक मदतगार समिती)

spot_img
spot_img