हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

खा.प्रफुल्ल पटेलांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क ◼️मतदान केंद्रांवरील अव्यवस्थेची केली जिल्हा पोलीस अधीक्षक,उपविभागीय अधिकारीना तक्रार

spot_img

🔴 LIVE TV 🔴

खा.प्रफुल्ल पटेलांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

◼️मतदान केंद्रांवरील अव्यवस्थेची केली जिल्हा पोलीस अधीक्षक,उपविभागीय अधिकारीना तक्रार

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज (ता १९) पत्नी व कुटुंबीयांसह गोंदिया येथील मतदान केंद्र गाठून मतदानाचा हक्क बजावला.
प्रफुल्ल पटेल हे काल, बारामती मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुमित्रा पवार यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित होते. दरम्यान, रात्रीपर्यंत ते गोंदियात परतले. व आज, सकाळीच त्यांनी पत्नी वर्षा पटेल व मुली पुर्णा व अवणी व मुलगा प्रजय यांच्यासह स्थानिक एनएमडी कॉलेज येथील मतदान केंद्रात जाऊन मतदान करून आपली जबाबदारी पार पाडली.


दरम्यान, त्यांना या केंद्रात असलेल्या अव्यस्थेची व पोलीसांकडून मतदारांसोबत होत असलेल्या अरेरावी ची माहिती माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली असता त्यांनी या अव्यवस्थेची तक्रार मोबाइल द्वारे उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील आणि पोलीसांची
मतदारांसोबत होत असलेल्या अरेरावीची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना करून त्वरित दखल घेण्याची मागणी केली. या मतदार केंद्रावर बहुतांश मतदारांना मतदार पावती चे वितरण न करण्यात आल्यामुळे बहुतांश मतदारांना आपला मतदानाचा हक न बजावताच परत जाण्याची नामुष्की ओढवली. याबाबत ची ही तक्रार आपण जिल्हा निवडणूक अधिकारी यांचेकडे करणार असल्याचे खा.प्रफुल पटेलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

◼️माजीमंत्री बडोलेंनी केले मतदान…
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सडक अर्जुनी येथील मतदान केंद्रावर माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांनी त्यांच्या सौभाग्यवती शारदा बडोले यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला.

◼️तिल्ली येथील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड…
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघांतर्गत येत असलेल्या तिल्ली येथील बूथ क्रमांक ४८ या मतदान केंद्रावर असलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया थांबवावी लागली. ईव्हीएम मशीनचे बटण दाबल्यावर ती बंद पडत असल्याची तक्रार तेथील मतदारांनी मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांकडे केली असल्याचे मतदान अधिकारी मेश्राम यांनी सांगितले.

◼️आसलपाणी केंद्रातील चमूत बदल…

तिरोडा विधानसभा क्षेत्रातील गोरेगाव तालुक्यातील आसलपानी मतदान केंद्र २२७ वरील अधिकाऱ्यांच्या चमूला काही कारणास्तव तत्काल प्रभावाने बदलून त्यांच्याठिकाणी आरक्षित पोलिंग पार्टीला तैनात करण्यात आले.

spot_img
spot_img