हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर येथे 57 वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले

spot_img

🔴 LIVE TV 🔴

वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर येथे 57 वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले
नागपूर, फेब्रुवारी 2024- आरोग्य सेवा क्षेत्रात अग्रगण्य असलेले वोक्हार्ट हॉस्पिटल नागपूर पुन्हा एकदा एक नवीन मेडिकल केस घेऊन आले. हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया एक चमत्कारच होता आणि वोक्हार्ट हॉस्पिटल्सची समर्पित टीम ही सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याच्या त्यांच्या ध्येयाचा पुरावा आहे.
नागपुरातील 57 वर्षीय पुरुष रुग्णाला अचानक श्वास घेण्यास त्रास आणि काम करताना छातीत हलके दुखणे अशी लक्षणे दिसून आली. पुढील तपासासाठी त्याला वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये डॉ.अक्षय सिंग यांच्याकडे पाठवण्यात आले. रुग्णाची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर कोरोनरी अँजिओग्राफी करण्यात आली. अँजिओग्राफी रिपोर्टमध्ये एलएडी (लेफ्ट अँटीरियर डिसेंडिंग आर्टरी) आणि आरसीए (राइट कोरोनरी आर्टरी) चे क्रॉनिक टोटल ऑक्लुजन (सीटीओ) असल्याचे आढळून आले. दोन्ही मुख्य धमन्या पूर्ण ब्लॉक झाल्यामुळे आम्ही मायोकार्डियमच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी कार्डियाक एमआरआय करण्याचा निर्णय घेतला.

कार्डियाक एमआरआय रिपोर्टमध्ये मायोकार्डियमची आंशिक क्षमता दिसून आली, म्हणून पीटीसीए हा पर्याय नसल्यामुळे सीएबीजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णाला संपूर्ण धमनी रिव्हॅस्क्युलरायझेशनसह सीएबीजी केले गेले. एलआयएमएला इन-सीटू ग्राफ्ट म्हणून एलएडीशी जोडण्यात आले. आरआयएमए ला डिस्टल आरसीए मध्ये इन-सीटू ग्राफ्ट म्हणून जोडण्यात आले.

डॉ. अक्षय सिंग, कन्सल्टन्ट-सीव्हीटीएस, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर यांनी सांगितले की, डिस्टल आरसीए ओपन केले तेव्हा ते पूर्णपणे कॅल्सीफाईड होते म्हणून एंडारटेरेक्टॉमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. लाँग सेगमेंट एंडारटेरेक्टॉमी करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर, रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि 3 दिवसांनंतर त्याला आयसीयू मधून बाहेर हलवण्यात आले आणि 2 दिवसांनंतर स्टेबल कंडिशनमध्ये डिस्चार्ज देण्यात आला. याव्यतिरिक्त,एंडार्टेरेक्टोमाइज्ड धमनीच्या एंडोथेलायझेशनसाठी इतर अँटी-प्लेटलेट्ससह वॉरफरीन चालू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्णाची नियमित तपासणी केली जात असून त्याची प्रकृती आता चांगली आहे.

श्री अभिनंदन दस्तेनवार, सेंटर हेड, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर म्हणाले, “वोक्हार्ट हॉस्पिटलला अशा प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा मिळाल्याचा अभिमान वाटतो ज्यामुळे अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे शक्य होते. ही खरोखर एक आव्हानात्मक केस होती आणि आमचे एक्स्पर्ट डॉक्टर्स, क्रिटिकल केअर एक्स्पर्ट टीम, आणि नर्सिंग स्टाफ यांनी एक अद्भुत काम केले आणि रुग्णाचा जीव वाचला.
डॉ. अक्षय सिंग, कन्सल्टन्ट-सीव्हीटीएस, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर यांनी पुढे सांगितले, योग्य उपचारांद्वारे हृदयविकाराचा त्रास असलेले रुग्ण दीर्घकाळ निरोगी राहू शकतात. नवीन प्रकारच्या ऑपरेशनद्वारे धमनीतील ब्लॉकेज दूर केले जाऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. अक्षय सिंहने आपल्या संदेशात म्हटले आहे की, हृदयविकार असलेल्यांनी त्यांच्या डॉक्टरांना त्यांच्या उपचारासाठी काय चांगले आहे हे विचारले पाहिजे. योग्य सल्लामसलत केल्याने, रुग्णाच्या अर्ध्याहून अधिक समस्या बरे होऊ शकतात. डॉ. अक्षय सिंग मध्य प्रदेशातील जबलपूर, रीवा आणि सतना येथेही ओपीडी सेवा पुरवतात.

spot_img
spot_img