हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

भंडारा-गोंदियात १८ उमेदवारांमध्ये रंगणार रणसंग्राम ◼️भाजपा विरूद्ध काँग्रेस थेट लढत

spot_img

🔴 LIVE TV 🔴

भंडारा-गोंदियात १८ उमेदवारांमध्ये रंगणार रणसंग्राम

◼️भाजपा विरूद्ध काँग्रेस थेट लढत

गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात आज 30 मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवशी एकूण 22 उमेदवारी अर्जांपैकी, आज 4 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता एकूण 18 उमेदवारांमध्ये रणसंग्राम होणार आहे. यात थेट लढत भाजपा-काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये दिसणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 27 मार्च रोजी 40 उमेदवारांनी 49 अर्ज दाखल केले होते. ज्यापैकी छानणीत 15 अपक्ष उमेदवारांसह 22 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. दरम्यान आज, अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असता 4 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे 18 उमेदवार आता रिंगणात असून थेट लढत काँग्रेसचे प्रशांत पडोळे विरुद्ध भाजपाचे सुनील मेंढे अशीच राहणार आहे. तर दूसरीकडे भाजपमधून बंडखोरी करत बीएसपी कडून उमेदवारी मिळालेल्या संजय कुंभलकर हे भाजपचे किती मत आपल्याकडे वळविण्यात यशस्वी होतात यावर लक्ष राहणार आहे. महत्वाचे म्हणजे वंचित कडून संजय केवट यांना उमेदवारी असली तरी या निवडणूकीत भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात वंचीतला जनाधार नसल्याचे चित्र सध्यातरी पहायला मिळत आहे. त्यामुळे सरळ लढत काँग्रेस विरुद्ध भाजपा अशीच पहायला मिळणार आहे.

spot_img
spot_img