हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

कत्तलखान्याकडे जाणार्‍या 21 गोवंशांची सुटका ◼️रावणवाडी पोलिसांची कारवाई

spot_img

🔴 LIVE TV 🔴

कत्तलखान्याकडे जाणार्‍या 21 गोवंशांची सुटका

◼️रावणवाडी पोलिसांची कारवाई

गोंदिया, : रावणवाडी पोलिसांनी तालुक्यातील चंगेरा शिवारात 29 मार्च रोजी सापळा रचून कत्तलखान्याकडे जाणार्‍या 21 गोवंशांची सुटका केली. याप्रकरणी २ लक्ष १० हजाराचा मुद्देमाल हस्तगत जप्त करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांवर लक्ष ठेवून विशेष कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.

यातंर्गत रावणवाडी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथकाने चंगेरा शिवारात सापळा रचून एमएच 37, टी 3114 क्रमांकाचा ट्रकची पाहणी केली असता 2 लक्ष 10 हजार रुपये किमतीचे 21 गोवंश कोंबून कत्तलखान्याकडे घेऊन जात असल्याचे आढळल्याने पोलिसांनी ट्रक व गोवंश असा एकूण १४ लक्ष १० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी गोवंश मालक फिरोज खान रशीद खान (52, रा. सेलू), राजीव शफी कनुज (27 रा. बाजारटोला) व जितेंद्र हरीलाल अंबुले (29 रा. बाजारटोला) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ताब्यात घेतलेले गोवंश कोरणी येथील विठ्ठल रुख्मिणी गोशाळेत पाठविण्यात आले.

spot_img
spot_img