हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

मुलांनो, रडू नका, तर लढा.-प्रा. हेमराज चोखांंद्रे

spot_img

🔴 LIVE TV 🔴

मुलांनो, रडू नका, तर लढा.-प्रा. हेमराज चोखांंद्रे

मनसर रामटेक :- राष्ट्रीय आदर्श विद्यालय, मनसर येथे आज दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी इयत्ता नऊवी च्या विद्यार्थ्यांच्या वतीने इयत्ता दहावीच्या विध्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा शाळा व्यवस्थापन मंडळाचे सदस्य मा श्री होमराज हजारे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा श्री सतिश डोंगरे जिल्हा परिषद सदस्य, मा श्री सुरेशराव गायकवाड माजी सरपंच ग्राम पंचायत मनसर, प्रा. हेमराज चोखांंद्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रामटेक तालुका प्रमुख व प्रकाश हायस्कूल कान्द्री चे प्राचार्य मा श्री मिलिंद वानखेडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विध्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले.

त्यावेळी प्रा श्री हेमराज चोखांद्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, हा काळ स्पर्धेचा आहे, ह्यात विद्यार्थ्यांनी कमी गुण मिळाले म्हणून रडू नये तर आलेल्या परिस्थितीशी लढावे, लढा दिल्याशिवाय तरणोपाय नाही, लढाल तर तर जिंकाल असा जोश उपस्थित विध्यार्थ्यांना यावेळी भरला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा सौ शेंदरे मॅडम,मा लेंडे सर, चन्ने सर व इतर शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतला.

spot_img
spot_img