हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

आमगावच्या जंगलात वणवा भडकला ◼️ ८ एकरातील वनसंपदा नष्ट

spot_img

🔴 LIVE TV 🔴

आमगावच्या जंगलात वणवा भडकला ◼️ ८ एकरातील वनसंपदा नष्ट

गोंदिया WH न्यूज़ : जिल्ह्यातील देवरी वन विभागांतर्गत येत असलेल्या आदर्श आमगाव येथील जंगलात (ता. २७ ) दुपारच्या सुमारास वणवा लागल्याने ८ एकर जंगल परिसरातील वनसंपदा जळून नष्ट झाली. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून सुमारे सहा तास परिश्रम करून या वनव्यावर नियंत्रण मिळविले.

देवरी तालुक्यातील आदर्श आमगाव येथील जंगलात विविध प्रजातीचे मौल्यवान वृक्ष असून बिबट, हरीण, काळविट, अस्वल आदी अनेक वन्यप्राणी आहेत. दरम्यान, बुधवारी दुपारच्या सुमारास या जंगलात वणवा पेटल्याची माहिती वनविभाग देवरीला मिळाली. त्यानंतर देवरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धात्रक व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले आणि झाडाच्या फांद्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, जोराचा वारा वाहत असल्यामुळे वणव्यावर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येत होत्या. तथापि, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायर ब्लोअरची मदत घेण्यात आली, तब्बल सहा तासांत या वणव्यावर नियंत्रण मिळविता आले. जंगलात आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण कळू शकले नाही. मात्र, या वणव्यात अंदाजे ८ – १० एकरातील वनसंपदा जळून नष्ट झाली आहे.

◼️वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव….

जंगल परिसरात वणव्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. वणवा कसा लागतो, हा चिंतनाचा विषय आहे. मात्र, वणव्यामुळे जंगलातील दुर्मिळ वनौषधी, वनस्पती नष्ट होत आहे. नैसर्गिक पानवठेही नष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे.

spot_img
spot_img