हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

भाजपाकडून छोट्या पक्षांचा नेहमीच सन्मान – चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा – चुकीची बातमी देणाऱ्यास कायदेशीर नोटी

spot_img

🔴 LIVE TV 🔴

 

भाजपाकडून छोट्या पक्षांचा नेहमीच सन्मान
– चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
– चुकीची बातमी देणाऱ्यास कायदेशीर नोटी

नागपुर –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत असून, जे लहान पक्ष भाजपाची साथ देण्यास उत्सुक आहेत, त्यांना सोबत घ्या असे मार्गदर्शन मी कार्यकर्त्यांना केले. या विधानाचा विपर्यास करून चुकीची बातमी प्रसिद्ध झाली. अशी खोडसाळ देणाऱ्या पत्रकाराला मी कायदेशीर नोटीस देणार असल्याचे भारतीय जनता पार्टीच प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते, श्री बावनकुळे म्हणाले, “केंद्रात भाजपाचे बहुमत असतानाही एनडीएमध्ये १४ ते १९ पक्षांना सामावून घेत सन्मानाचे स्थान दिले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांना महत्वाची खाती दिली. बच्चू कडू यांना मविआमध्ये जेवढा सन्मान मिळाला नाही त्यापेक्षा जास्त सन्मान महायुती काळात मिळत आहे. आताही महाराष्ट्रात भाजपा सर्वांत मोठा पक्ष असताना मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिले. भाजपा सोबत असणाऱ्या लहान पक्षांना सांभाळणारी व सन्मान देणारी पार्टी आहे. पक्ष वाढविण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. पक्षात भरपूर जागा असून जे मोदींच्या गॅरेंटीवर विश्वास ठेवून पक्षात येतील त्या सर्वांना पक्षात प्रवेश देऊ. ”

विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, शरद पवार आणि कॉंग्रेसने नेहमीच लहान पक्ष संपविण्याचे काम केले आहे. विरोधकांना विकासावर काहीच बोलता येत नाही. त्यामुळे सकाळी उठून नॅरेटिव्ह सेट करतात. पक्षाच्या नेत्यांनी विकासावर बोलावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

spot_img
spot_img