हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

पंतप्रधानाच्या ‘त्याʼ फोटोचा शेतकर्‍यांना फटका..!आचारसंहितेत अडकली खत विक्री..समस्या वाढल्या

spot_img

🔴 LIVE TV 🔴

पंतप्रधानाच्या ‘त्याʼ फोटोचा
शेतकर्‍यांना फटका..!आचारसंहितेत अडकली खत विक्री..समस्या वाढल्या

गोंदिया : खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असल्याने आदर्श आचार संहितेमुळे खत विक्रीच आता वांद्यात आली असून नेमके काय करावे, असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. स्टीकर लावून फोटो झाकायचा असेल तर संबंधित कंपन्यांनीच स्टीकर पुरवावीत, असे विक्रेत्यांचे म्हणणे असून खत विक्री थांबविण्यात आली आहे. याचा फटका मात्र, शेतकर्‍यांना बसत आहे.

केंद्र शासनाच्या खते विभागाने देशात ‘भारत’ या एकाच नावाखाली विविध खतांचा पुरवठा करण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना दिल्या. त्यानुसार गतवर्षीपासून कंपन्यांकडून ‘भारत’ नावाखाली खत पुरवठा होत आहे. खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावर आयोगाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र काढून, कोणत्याही राजकीय व्यक्तीचे फोटो अथवा मतदारांवर प्रभाव पडेल असा मजकूर असल्यास त्यावर स्टिकर लावून झाकूनच संबंधित वस्तूची विक्री करण्याचे आदेश दिले आहे.

त्यात खत गोण्यांचाही समावेश होत आहे. स्टीकर लावल्याचे आढळले नाही अथवा कोणाची तक्रार आली तर संबंधित दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे कळविले आहे. त्यातच खत विक्रेत्यांकडे हजारो टन खताचा साठा गोदामात आहे. आता सद्या उन्हाळी धान पिकासह भाजीपाला व उसाच्या डोससाठी शेतकरी खताची मागणी करीत आहेत. खताच्या गोण्यांवर असलेला फोटो झाकण्यासाठी दुकानदाराकडे स्टिकर उपलब्ध नाहीत. बाजारातून अशी स्टिकर विकत आणणे दुकानदारांना परवडत नाहीत. त्यामुळे विक्रेत्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. तर गोदामात खताचा पुरेसा साठा उपलब्ध असला तरी कृषी केंद्र संचालक ते शेतकर्‍यांना विक्री करू शकत नाहीत. तेव्हा संबंधित कंपन्यांनी फोटोवर स्टिकर लावण्याची व्यवस्था करावी अशी मागणी कृषी केंद्र संचालक करीत आहेत.

रंगही लावता येईना..

■ खताच्या गोणीवरील पंतप्रधान मोदी यांच्या फोटोला रंग लावायलाही दुकानदार धजत नाहीत. रंग लावून फोटो झाकला तर त्याला वेगळाच ‘रंग’ येण्याची भीती असल्याने संबंधित कंपन्यांनीच विक्रेत्यांना स्टिकर पुरवावे, विक्रेते ते गोण्यांवर लाऊन खत विक्री करतील, किंवा निवडणूक आयोगाने पर्याय काढावा याकरिता आज, (ता. 20) एम.ए.एफ.डी.ए.चे राज्याध्यक्ष विनोद तर्‍हाड पाटील यांनी कृषी मंत्रालयाचे सचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आज सायंकाळपर्यंत निर्णय घेण्यात येणार असल्याचे येथील कृषी केंद्र संचालक संघटनेचे मुकेश अग्रवाल यांनी कळविले आहे.

◼️शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचा प्रकार ….

शेतातील पिकासाठी खताची नितांत गरज आहे. मात्र, पंतप्रधानांचे फोटो असल्यामुळे आचार संहितेत शेतकर्‍यांना सदर खताचा पुरवठा करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. संबंधित कंपन्यांनी आचार संहिता लक्षात घेत यापूर्वीच स्टिकर उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र, अशा कसल्याच हालचाली झालेल्या नाहीत, तेव्हा हा प्रकार शेतकर्‍यांना वेठीस धरण्यासारखाच आहे.

रेखलाल टेंभरे, संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक, गोंदिया
०००००००००

spot_img
spot_img