हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

दागिने लुटून खून करणार्‍यास आजन्म कारावास ◼️ अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय ◼️20 हजार रुपयांचा दंडही ठोठावला

spot_img

🔴 LIVE TV 🔴

दागिने लुटून खून करणार्‍यास आजन्म कारावास

◼️ अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय
◼️20 हजार रुपयांचा दंडही ठोठावला

गोंदिया, : शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेचे दागिने लुटून तिचा काठी व धारदार शस्त्राने खून करणार्‍या आरोपीला जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आज, (ता.22) आजन्म सश्रम कारावास व 20 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. यशवंत भाऊलाल लिल्हारे, (वय ३२ वर्षे, रा. पिपरिया, ता. तिरोडा, जि. गोंदिया) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सविस्तर असे की, घटनेच्या दिवशी 11 एप्रिल 2019 रोजी फिर्यादी तेजराम तुलाराम सेलोकर (वय 50, रा. खैरलांजी, पो. परसवाडा, ता. तिरोडा, जि. गोंदिया) यांची पत्नी अंतकला तेजराम सेलोकर, (वय 43) वर्षे ही गुरे चारण्यासाठी तिच्या शेतावर सकाळी 8 वाजताच्या सुमारास गेली असता तिला शेतावर एकटी पाहून आरोपीने तिच्या डोक्यावर, गळ्यावर व चेहऱ्यावर काठीने व धारदार वस्तूने मारहान करून तिला जखमी केले व तिच्या गळ्यातील 5 ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व 20 सोन्याचे मणी असा एकूण 21 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे बळजबरीने तिच्या अंगातून काढून घेवून पळून गेला होता. यावेळी गावातील अरविंद भगत याच्या माहितीवरून फिर्यादी शेतावर गेले असता अंतकला रस्त्याच्या कडेवर जखमी अवस्थेत आढळली. यावेळी फिर्यादीने घटनेविषयी विचारणा केली असता तिने घडलेल्या घटनेची माहिती दिली. दरम्यान, फिर्यादीने तिला उपचारासाठी गोंदियाच्या खासगी रुग्णालय व नंतर पुढील उपचाराकरिता शासकीय महाविद्यालय, नागपूर येथे भरती करण्यात आले होते.

मात्र, उपचारादरम्यान 21 मे 2019 रोजी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून दवणीवाडा पोलीस ठाण्यात आरोपीविरूध्द कलम 302, 397 भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा नोंदवून तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक जयदिप विष्णू दळवी यांनी सविस्तर तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. सदर प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता महेश एस. चंदवानी व अति. सरकारी अभियोक्ता कृष्णा डी. पारधी यांनी एकुण 18 साक्षदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदवून घेतली. एकंदरित आरोपी व फिर्यादीचे वकील यांच्या युक्तीवादानंतर तसेच कागदोपत्री पुरावा व वैद्यकीय अहवाल या आधारावर जिल्हा न्यायाधीश-1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एम. खान यांनी सरकारी पक्षाचा पुरावा ग्राहय धरून आरोपीला कलम 302 भारतीय दंड विधान प्रमाणे सश्रम आजन्म कारावास व 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा तर कलम 397 भारतीय दंड विधान प्रमाणे 10 वर्षांचा सश्रम कारावास व 10 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 6 महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात पैरवी कर्मचारी दवनीवाडा पोलिस ठाण्याचे श्रीकांत मेश्राम यांनी काम पाहिले.

◼️फिर्यादीला मिळणार सानुग्रह अनुदान
न्यायालयाने आज, दिलेल्या निर्णयानुसार आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली असतानाच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांना कलम 357 (अ) (2) फौ. प्र. सं. प्रमाणे फिर्यादीला सानुग्रह नुकसान भरपाई देण्यासाठी आदेशित केले आहे.

spot_img
spot_img