हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

गोंदियात आढळल्या बंदुक व काडतूसीसह ५ तलवारी ◼️जिल्हा पोलिसांचा कोंबिंग ऑपरेशन ◼️एका गुप्तीसह दारूबंदी, जुगार, अंमली पदार्थ कायद्यान्वये लाखोंचा मुद्देमाल जप्त

spot_img

🔴 LIVE TV 🔴

गोंदियात आढळल्या बंदुक व काडतूसीसह ५ तलवारी

◼️जिल्हा पोलिसांचा कोंबिंग ऑपरेशन

◼️एका गुप्तीसह दारूबंदी, जुगार, अंमली पदार्थ कायद्यान्वये लाखोंचा मुद्देमाल जप्त

गोंदिया : आगामी लोकसभा निवडणूक व सण उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अवैध व्यवसायिक व गुंड प्रवृत्तीच्याविरुध्द २३ व २४ मार्च या कालावधीत कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले ज्यामध्ये पोलिसांनी एक बंदूक व काडतूसीसह पाच तलवार, एक गुप्ती व जुगार, अंमली पदार्थ कायद्यान्वये लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी आगामी सन उत्सवाच्या व निवडणुकीच्या अनुषंगाने संपुर्ण गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीत दिवस, रात्र दरम्यान प्रभावी गस्त, कोंबिंग ऑपरेशन, नाकाबंदी, राबविण्याबाबत आणि यादरम्यान सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सुचनेप्रमाणे संपुर्ण जिल्ह्यात कारवाई करण्याकरिता मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आलेला आहे. यादरम्यान अवैध धंद्यावर धाडी, गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी गस्त पेट्रोलिंग, त्याचप्रमाणे अवैध शस्त्रे बाळगणारे, दहशत माजविणारे गुन्हेगारांवर प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याकरिता सम्पूर्ण गोंदिया जिल्हा पोलीसांचे कारवाई पथके नेमण्यात येवुन २३ ते २४ मार्च या कालावधीत मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या.

उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे नेतृत्वात गोंदिया उपविभागातील गोंदिया शहर, रामनगर, गोंदिया ग्रामीण परिसरात रात्र दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, शहर पोलिस व सी- ६० पथकाने संयुक्तरित्या कारवाईची प्रभावी कोंबिंग ऑपरेशन ची मोहीम राबविली. या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गोंदिया शहर हद्दीत पैकणटोली गौतमनगर, कुंभारेनगर, सावराटोली, छोटा गोंदिया, रामनगर, कुडवा, जब्बारटोला या परिसरातील रेकॉर्डवरील व सर्व सराईत गुन्हेगारांना चेक करण्यात आले व त्यांचे घराची झाडाझडती घेण्यात आली.

ज्यामध्ये अतिश संतोष करोसीया, (वय ३० वर्षे, रा. पैकनटोली, बाजपेयी वार्ड) याचे घरून तीन नग जुन्या तलवारी किमत २ हजार ३३०, आरोपी कांतीलाल सुरजलाल ढोमणे ( वय ४६, रा. वार्ड नं. १, मुर्री ता.जि. गोंदिया) याचे घरून एक नग जुनी लोखंडी तलवार व एक नग लोखंडी गुप्ती असा एकुण २ हजार २०० रुपयांचा शस्त्रसाठा, आरोपी शुभम पुरुषोत्तम हरदीये (वय २५ रा. श्री. भिमटे यांचे घरी, बाजपेयी वार्ड) याचेकडून २५ हजार रुपये किमतीची एक लोखंडी पिस्टल मॅग्जीनसह एक पिवळया धातुचा जिवंत काडतुस असा २६ हजार रुपयांचा शस्त्रसाठा, पंकज कुमार चंद्रप्रकाश उर्फ संतोष आग्रे (वय १९ रा. पैकणटोली गोंदिया) याचे घर झडतीत एक लोखंडी तलवार किमत १ हजार २०० रुपये अशाप्रकारे एकूण ५ तलवारी , १ गुप्ती, १ पिस्टल, १ जिवंत काडतूस अग्निशस्त्र, अवैध शस्त्रे तलवारी मिळुन आल्याने हस्तगत करून जप्तीची कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे संपुर्ण गोंदिया जिल्हा स्तरावर अवैध दारूबंदी कायद्यान्वये एकूण ५२ इसमाविरूध्द कारवाई करण्यात आलेली असून गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ज्यामध्ये एन.डी.पी.एस. कायद्या अंतर्गत २, जुगार कायद्या अंतर्गत २ कारवाई करण्यात आली असून ३ लाख ७४ हजार ९७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तर अवैध कृती करणाऱ्या विरुध्द
कलम ११० अंतर्गत ३, कलम ९३ अंतर्गत १२ जणांवर, कलम ११०, ११२ ,११७ मपोका अंतर्गत 1 कारवाई, कलम १०७ अंतर्गत ४० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. गोंदिया जिल्हा पोलीसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यातील विशेषतः गोंदिया शहरातील सराईत गुन्हेगारांची व गावगुंडांना कारवाईची धडकी भरली आहे.

spot_img
spot_img