हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

त्याʼ तीन गावांचाही लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार! ◼️विद्युत समस्या सोडविण्याची मागणी ◼️जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

spot_img

🔴 LIVE TV 🔴

त्याʼ तीन गावांचाही लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार!

◼️विद्युत समस्या सोडविण्याची मागणी

◼️जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

गोंदिया WH न्यूज़ , गेल्या अनेक दिवसापासुन परीसरात वीजेचा लपंडाव होत असून चोवीस तासातून अर्धेअधिक वेळ विद्युत पुरवठा बंद राहत असतानाच वारंवार तक्रार करूनही ही समस्या सुटत नसल्यामुळे विद्युत समस्या तात्काळ सोडवा अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशारा गोंदिया तालुक्यातील नवरगाव (कला), इर्री, मोरवाही या तीन गावातील नागरिकांनी दिला आहे. तर तसे निवेदनही बुधवारी (ता-27) जिल्हाधिकाऱ्याना दिले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच जिल्ह्यातील आमगाव नगरपरिषद क्षेत्रातील 8 गावातील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.

गोंदिया तालुक्यातील नवरगाव(कला)इर्री,मोरवाही या तिन्ही गावात विद्युत समस्या अत्यंत गंभीर असून चोवीस तासातून अर्धेअधिक वेळ विद्युत पुरवठा बंदच राहत असते. त्यातच नियमित विद्युत पुरवठा होत नसल्याने या गावातील शेतकऱ्यांनी लावलेले रब्बी धान पीक करपून मरणासन्न झाले आहे. त्यातच रात्री-अपरात्री विद्युत पुरवठा बंद होत असल्याने लहान मुलांचे व वयोवृद्ध नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एवढेच नव्हे तर परिक्षा काळात विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. सदर समस्या सोडविण्यासाठी येथील नागरिकांनी यापूर्वीही अनेकदा वीज वितरण कंपनीला निवेदन दिले आहे. तर गेल्या महिन्यात झिलमिली येथील कनिष्ठ अभियंता कार्यालयावर धडक मोर्चादेखील काढण्यात आला होता. यावेळी स्थानिक आमदार विनोद अग्रवाल यांनी मध्यस्थी करुन सदर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र, महिना उलटूनही विद्युत समस्या मार्गी लागलेली नाही. यावरून आमदारांच्या आश्वासनालाही वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. आमदारांच्या आश्वासनानंतरही परिसरातील विद्युत समस्या “जैसे थे ” राहिली, त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. विद्युत समस्या सुटत नसल्यामुळे अखेर या गावातील नागरिकांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र ही बुधवारी(ता.27) जिल्हाधीकारी गोंदिया यांना दिले आहे. त्यामूळे गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयावर जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे या गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

◼️त्या 8 गावांचा प्रश्न कायम
जिल्ह्यातील आमगाव नगरपरिषद स्थापनेचे प्रकरण गेल्या 9 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, आजतागायत यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे या नगरपरिषद क्षेत्रात येत असलेल्या 8 गावातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. यावर संबंधित 8 गावातील नागरिकांनी संघटित होऊन येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निवेदनही मुख्यमंत्र्यांना दिले आहे. मात्र, यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे त्या आठही गावांचा प्रश्न कायम आहे. अशावेळी गोंदिया तालुक्यातील तीन गावातील नागरिकांनीही निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ निर्माण झाली आहे.

spot_img
spot_img