हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

लोकसंगीत देशाच्या सांस्कृतिक वैभवाचा ठेवा – मंत्री सुधीर मुनगंटीवार

spot_img

🔴 LIVE TV 🔴

लोकसंगीत देशाच्या सांस्कृतिक वैभवाचा ठेवा

– मंत्री सुधीर मुनगंटीवार

            मुंबई, दि. 17 :- लोक संगीताचे सूर मनात  ऊर्जा व चैतन्य निर्माण करतात. लोकसंगीत हे देशाच्या सांस्कृतिक वैभवाचा ठेवा आहे. आईच्या आवाजानंतर मनाला ऊर्जा देणारा दुसरा आवाज म्हणजे लोकसंगीताचा आवाज आहेअसे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

            गोरेगाव येथील स्टुडिओमध्ये सुरू असलेल्या प्रसिद्ध  गायक कैलास खेर यांच्या भारत का अमृत कलश कार्यक्रमास मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी भेट देऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी कार्यक्रमात सहभागी कलाकारांशी संवाद साधताना त्यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी गायक कैलास खेर यांनी त्यांचे शब्द सुमनांनी स्वागत केले.

            मनाला ऊर्जा देणाऱ्या लोकसंगीताच्या स्वरांनी आपण आज मंत्रमुग्ध झालो आहोत. गायक हे कोहिनूर पेक्षाही श्रेष्ठ असतात, असे गौरवोद्गार काढून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व गायक व कलाकारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या मन वढाय वढायउभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकलाफिरी येतं पिकांवर ।। या कवितेचे वाचन केले.

spot_img
spot_img